कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गोड गिफ्ट दिले आहे. आमदार काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १९ टक्के बोनस (Bonus) देण्याचे जाहीर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
नक्की पहा : आरक्षणावरून मनोज जरांगेंनी केलं सर्वात मोठं विधान
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे यांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासताना दरवर्षी कर्मचाऱ्यांना भरघोस दिवाळी बोनस देवून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. ही परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू असल्याने यावर्षी देखील कामगारांना १९ टक्के बोनस देण्याचा निर्णय आमदार आशुतोष काळे यांनी घेतला आहे.
हेही पहा: नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंचा ‘ओले आले’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार
ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून बुधवार (ता.०८) पासून ही रक्कम कर्मचाऱ्यांना प्राप्त होवून एकूण साडे पाच कोटी रुपये बाजारात येणार आहे. त्यामुळे निश्चितपणे बाजरपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल वाढणार असून व्यापाऱ्यांचा देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचे युनियन प्रतीनिधी जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ, संजय वारुळे, विरेंद्र जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले असून त्यांचा सत्कार केला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, डिस्टीलरीचे जनरल मॅननेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद, सेक्रेटरी संदीप शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे आदी होते.