Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी मिळणार

0
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे १५०० रुपये 'या' दिवशी मिळणार
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे १५०० रुपये 'या' दिवशी मिळणार

नगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याच्या हप्त्याची (April Installment) राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात येत्या २ ते ३ दिवसात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. तर,ज्या लाडक्या बहि‍णींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण १२ हजार रुपये मिळतात,त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा ५०० रुपये दिले जाणार आहेत.

 नक्की वाचा : माणसे जोडणारा नेता हरपला! जाणून घ्या,माजी आमदार अरुण जगतापांचा राजकीय प्रवास…

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या ? (Ladki Bahin Yojana)

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी  लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

अवश्य वाचा : सचिन कुर्मींच्या हत्येमागे भाजप व शिवसेना नेत्याचा कार्यकर्ता;कुटूंबाचा आरोप   

एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यास उशीर का?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जातात. मात्र, यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे. मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हफ्ता थकला असल्याची माहिती आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे आता हफ्ता थकण्याची शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे.

किती लाभार्थ्यांना मिळणार पैसे ?(Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवण्यात येते. या विभागाकडून आतापर्यंत या योजनेच्या ९ हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. पात्रलाभार्थी महिलांना आतापर्यंत १३ हजार ५०० रुपये मिळाले आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी २ कोटी ४७ लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल.