LCB | शेवगावात ऑनलाईन बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

0
LCB .
LCB .

LCB | नगर : शेवगाव (Shevgoan) तालुक्यात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छापा टाकून एक लाख तीन हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : त्याने धर्म सांगताच मारली गोळी!;पहलगाम हल्ल्याची आपबिती…

हे आहेत संशयित आरोपी (LCB)

 बळीराम भानुदास मोहिते (वय २५, रा.वडारगल्ली, शेवगाव), सोहेल रफीक शेख (वय २६, रा.नायकवाडी मोहल्ला, शेवगाव), मोहसीन सलीम शेख (वय ३०, रा.ईदगाह मैदान, शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे चौकशी केली असता गोपाळ कुसळकर, (रा.वडार गल्ली, शेवगाव), सुरज कुसळकर हे बिंगो चालवित असल्याचे सांगितले. तसेच बिंगो जुगारासाठी लागणारे आयडी पासवर्ड अशपाक शेख (रा.श्रीरामपूर), समीर कुरेशी (रा.राहाता), अफरोज शेख (रा.श्रीरामपूर), महादेव कुत्तरवाडे (रा.सोनई, ता.नेवासा), सलीम शेख (रा.शेवगाव), (सर्व पसार) यांच्याकडून घेतले असल्याचे पोलीस तपासत पुढे आले. आरोपींकडून १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अवश्य वाचा : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर,शक्ती दुबे देशात प्रथम तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला 

आरोपींना ताब्यात घेतले (LCB)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव परिसरात अवैध ऑनलाईन बिंगो जुगार खेळला जात असल्याची खात्रीशीर माहिती समजली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने मोची गल्लीतील एका हॉटेल समोर काळू कुसळकर व सुरज कुसळकर हे यांच्यामार्फत एका टपरीमध्ये टीव्ही स्क्रीनवर बिंगो जुगार खेळत व खेळवित असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here