Lok Sabha Elections : नगर : लाेकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महायुतीला मोठे यश मिळणार आहे. २०१९ च्या विधानसभेत राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवेल. विरोधकांमध्ये आता कोणताही आत्मविश्वास राहिला नाही. विरोधी आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे. विराेधकांना पराभव समोर दिसू लागल्याने फतवे काढून राजकारण (Politics) करण्याची वेळ आली आहे, अशी जोरदार टीका उत्तरप्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी खासदार डॉ. दिनेशकुमार शर्मा (Dinesh Kumar Sharma) यांनी केली.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
युवा वॉरियर्स मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन (Lok Sabha Elections)
शर्मा यांनी नगर आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचा दोन दिवस दौरा केला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते युवा वॉरियर्स यांच्याशी संवाद साधून निवडणुकीतील बारकावे त्यांनी जाणून घेतले. नगरमध्येही युवा वॉरियर्स या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माध्यमांशी बाेलताना शर्मा म्हणाले, ”मतांच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढून कुणी राजकारण करणार असेल, तर त्याला जनता थारा देणार नाही. जनता ‘वोट जिहादचे राजकारण’ झुगारून देऊन मतांची क्रांती करून राष्ट्रवादाला पाठबळ देईल.
हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या
जनता राष्ट्रवादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील (Lok Sabha Elections)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळवून देताना कधीही धर्माचा विचार करून भेद निर्माण होऊ दिला नाही. समाजातील प्रत्येक घटकांची उन्नती हाच योजना सुरू करण्यामागचा विचार आहे. पण केवळ आता मताच्या तुष्टीकरणासाठी फतवे काढले जात असतील, तर सुज्ञ मतदार अशा राजकारणाला कधीही साथ देणार नाहीत. जनता राष्ट्रवादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील वोट जिहादच्या राजकारणाला मतांची क्रांती करून उत्तर देईल. राहुल गांधी यांनी मतदार संघ बदलावर बोलताना डॉ, शर्मा म्हणाले, ”डरो मत असे बोल होते. प्रियंका गांधी ‘मै लढती हू लढती रहुंगी’ असे देशभर सांगत होत्या. मात्र, निवडणुकीत त्यांची भूमिका ही केवळ राजकीय पर्यटनाची असून निवडणुका झाल्या की त्या लगेच रोम आणि इटलीत दिसतील,” अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. दिनेश शर्मा हे नगरमध्ये आल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत चर्चा केली.