Radhakrishna Vikhe Patil : आगामी सर्वच निवडणुका एक विचाराने लढवणार; विखे, शिंदे यांची ग्वाही

Radhakrishna Vikhe Patil : आगामी सर्वच निवडणुका एक विचाराने लढवणार; विखे, शिंदे यांची ग्वाही

0
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : आगामी सर्वच निवडणुका एक विचाराने लढवणार; विखे, शिंदे यांची ग्वाही

Radhakrishna Vikhe Patil : नगर : आमच्यात आता कोणतेही मतभेद राहिलेले नाही. यापुढील सर्व निवडणूका (Election) आम्ही एकत्रित येऊन एक विचाराने लढवणार आहोत,” अशी ग्‍वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज जामखेड शहरातील चुंभळी येथील जाहीर सभेत दिली.

हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या

महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती (Radhakrishna Vikhe Patil)

लोकसभा निवडणूक प्रचाराच्‍या निमित्ताने शहरातील जामवाडी, तपनेश्‍वर, मुख्‍य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्‍ती, आरोळे वस्‍ती आणि चुंभळी येथे नागरिकांच्‍या भेटी घेऊन संवाद साधला. केंद्र आणि राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयांची माहिती देऊन महायुतीच्‍या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्‍याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री आमदार राम शिंदे, शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, भाजपा नेते विनायकराव देशमुख यांच्‍यासह स्‍थानिक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

मतभेद नसल्याचे दोन्ही नेत्यांकडून जाहीर (Radhakrishna Vikhe Patil)

चुंभळी येथील कार्यक्रम सुरु होताच, उपस्थितांनी आमदार राम शिंदे यांच्‍यावर होत असलेल्‍या अन्‍यायाचा प्रश्‍न उपस्थित केला. आमदार शिंदे यांनीच या चर्चेत हस्‍तक्षेप करुन,” मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्‍ये आता कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. आपल्‍याला आता महायुतीच्‍याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्‍के मतदान हे महायुतीच्‍या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे .” असे सांगून त्‍यांनी हा विषय संपविला. याच विषयाचा उल्‍लेख करुन, मंत्री विखे पाटील यांनीही चुंभळी येथील म्हसाेबा महाराजांच्‍या देवस्‍थानाचा उल्‍लेख करुन, आमच्‍या लोणी बुद्रूक गावाचे ग्रामदैवत सुद्धा म्‍हसोबा महाराज आहेत. या देवस्‍थानांच्‍या साक्षीने सांगतो की, “आमच्‍या दोघांमध्‍ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवू नये.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here