नगर : बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयामध्ये (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे चाहते चिंतेत आलेत. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत.
नक्की वाचा : मनोज बाजपेयीच्या नव्या चित्रपटाची घोषणा ;पोस्टर रिलीज
अमिताभ बच्चन कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल (Amitabh Bachchan)
समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजता अमिताभ बच्चन यांना मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी देखील अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. अमिताभ बच्चन यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘सदैव कृतज्ञता व्यक्त करतो.’ अमिताभ बच्चन यांनी अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर ही पोस्ट केली असल्याचे म्हटले जात आहे.
अवश्य वाचा : उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री ;’या’ चित्रपटात झळकणार
वयाच्या ८१ व्या वर्षीहीअमिताभ बच्चन कार्यरत (Amitabh Bachchan)
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. ८१ व्या वर्षी देखील ते काम करत आहेत. अजूनही अनेक चित्रपटांमध्ये आणि ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो ते होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा फक्त भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या नवनवीन चित्रपटांसाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ते नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करतात. लवकरच अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत ३३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘थलाइवर १७०’ नावाच्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत स्क्रीन शेअर करणार आहेत.