Mahavitaran : नगर : महावितरणच्या (Mahavitaran) आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत (sports competition) पुणे-बारामती परिमंडलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा (Championship) मान मिळविला, तर कोल्हापूर परिमंडलास उपविजेतेपद मिळाले. यामध्ये नाशिक – जळगाव परिमंडळातील खेळाडूंनी वैयक्तिक गटात ५ सुवर्ण आणि ४ कांस्यपदक पटकाविली आहेत. तर खोखो (महिला) या सांघिक क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे.
नक्की वाचा: मराठा आरक्षणाविराेधातील पाेस्ट तातडीने थांबवा; अन्यथा मनाेज जरांगेंचा कडक शब्दात इशारा
अरविंद भादीकर यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान (Mahavitaran)
छत्रपती संभाजीनगर येथील पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका सभागृहात रविवारी (४ फेब्रुवारी) चार दिवसीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. सर्वाधिक पदके मिळविणाऱ्या पुणे-बारामती परिमंडलाच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. कोल्हापूर परिमंडलास उपविजेतेपद देण्यात आले. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रादेशिक संचालक (पुणे) अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची मंचावर उपस्थिती होती.
हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक
यांची उपस्थिती (Mahavitaran)
यावेळी मुख्य अभियंते सुचित्रा गुजर, भुजंग खंदारे, राजेंद्र पवार व परेश भागवत, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक तर व्यवस्थापक डॉ. शिवाजी तिकांडे व श्रावण कोळनूरकर यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी आभार मानले. खेळाडूंतर्फे विकास आढे व जयश्री सरोदे यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.
मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेते व उपविजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. राज्यातील नाशिक-जळगाव, छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड, कल्याण- रत्नागिरी, सांघिक कार्यालय-भांडूप, नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, अकोला-अमरावती, पुणे-बारामती व कोल्हापूर अशा १६ परिमंडलांचे ८ संयुक्त संघांतील जवळपास १५०० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. सांघिक खेळांचे अंतिम निकाल-अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – कोल्हापूर व कल्याण-रत्नागिरी, व्हॉलिबॉल – पुणे-बारामती व छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड, कबड्डी (पुरुष)- कल्याण-रत्नागिरी व कोल्हापूर, कबड्डी (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, खो-खो (पुरुष)- पुणे-बारामती व कोल्हापूर, खो-खो (महिला)- सांघिक कार्यालय-भांडूप व नाशिक-जळगाव, टेबल टेनिस (पुरुष)- कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, टेबल टेनिस (महिला)- अकोला-अमरावती व कल्याण-रत्नागिरी, बॅडमिंटन (पुरुष)- छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड व पुणे-बारामती, बॅडमिंटन (महिला)-नागपूर-चंद्रपूर-गोंदिया व पुणे-बारामती, कॅरम (पुरुष)- छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड व पुणे-बारामती, कॅरम (महिला)- कोल्हापूर व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, ब्रिज- छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया, टेनिक्वाईट महिला- पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया.
वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ) -अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – १०० मीटर धावणे – पुरुष गट – साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप) व गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व मेघा झुंजारे (कल्याण-रत्नागिरी), २०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व साईनाथ मसने (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व माया येळवंडे (पुणे-बारामती), ४०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) व विजय वारे (नाशिक-जळगाव), महिला गट – रिता तायडे (सांघिक कार्यालय-भांडूप) व भक्ती लोमटे (पुणे-बारामती), ८०० मीटर धावणे – पुरुष गट – प्रतीक वाईकर (पुणे-बारामती) व परेश चौधरी (नाशिक-जळगाव), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) व श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), १५०० मीटर धावणे – पुरुष गट – अबरार पटेल (नाशिक-जळगाव) व रामदास रोहनकर (अमरावती-अकोला), महिला गट- स्वाती दमाहे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अर्चना भोंग (पुणे-बारामती), ५००० मीटर धावणे – पुरुष – एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव) व प्रतीक वाईकर (पुणे-बारामती), ४ बाय १०० रिले – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे, प्रतीक वाईकर, अक्षय केंगळे, सोमनाथ कंठीकर (पुणे-बारामती) व संभाजी जाधव, नरेश सावंत, शुभम निंबाळकर, प्रदीप वंजारी (कोल्हापूर), महिला गट – प्रिया पाटील, सारिका जाधव, प्रेरणा रहाटे, सोनाली मोरे (सांघिक कार्यालय-भांडूप) व रागिणी बेले, स्वाती दमाहे. प्रीती फुल्लुके, श्वेतांबरी अंबाडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), गोळा फेक – पुरुष गट – प्रवीण बोरावके (पुणे-बारामती) व इम्रान मुजावर (कोल्हापूर), महिला गट – प्रियंका शेळके (नाशिक-जळगाव) व पूजा ऐनापुरे (कोल्हापूर), थाळी फेक – पुरुष गट – इम्रान मुजावर (कोल्हापूर) व अक्षय केंगळे (पुणे-बारामती), महिला गट- हिना कुरणे (पुणे-बारामती) व ज्योती कांबळे (कोल्हापूर), भाला फेक – पुरुष गट – अमित पाटील (कोल्हापूर) व अक्षय केंगळे (पुणे-बारामती), महिला गट – अश्विनी जाधव (कोल्हापूर) व हर्षला मोरे (कल्याण-रत्नागिरी), लांब उडी – पुरुष गट –अमित हुमणे (कल्याण-रत्नागिरी) व अक्षय केंगळे (पुणे-बारामती), महिला गट – संगीता पुंडे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व माया येळवंडे (पुणे-बारामती), उंच उडी – पुरुष गट – चेतन केदार ( नाशिक-जळगाव) व महेश नागटिळक (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), महिला गट – अश्विनी देसाई (कोल्हापूर) व सोनाली मोरे (सांघिक कार्यालय-भांडूप), बुद्धिबळ- पुरुष गट – नीलेश बनकर (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व स्नेहल चौधरी (सांघिक कार्यालय-भांडूप), महिला गट – रंजना तिवारी (कल्याण-रत्नागिरी) व अमृता जोशी (सांघिक कार्यालय-भांडूप), कॅरम – पुरुष गट – अनंत गायत्री (सांघिक कार्यालय-भांडूप) व संजय कांबळे (पुणे-बारामती), महिला गट – पुष्पलता हेडाऊ (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व तेजश्री गायकवाड (सांघिक कार्यालय-भांडूप), टेनिक्वाईट – महिला एकेरी – मनीषा चौकसे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व अमृता गुरव (पुणे-बारामती), महिला दुहेरी – शीतल नाईक- कोमल सुरवसे (पुणे-बारामती) व प्रज्ञा वंजारी- समिधा लोहारे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), टेबल टेनिस – पुरुष एकेरी – अतुल दंडवते (पुणे-बारामती) व मंगेश प्रजापती (सांघिक कार्यालय-भांडूप), पुरुष दुहेरी – अतुल दंडवते-दीपक रोटे (पुणे-बारामती) व अविनाश पवार (कल्याण-रत्नागिरी), महिला एकेरी – स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व रंजना तिवारी (कल्याण-रत्नागिरी), महिला दुहेरी- स्नेहल बढे-कोमल पुरोहित (अकोला-अमरावती) व अश्विनी शिंदे-सायली कांबळे (सांघिक कार्यालय-भांडूप), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – भारत वशिष्ठ (पुणे-बारामती) व पंकज पाठक (छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड), पुरुष दुहेरी – पंकज पाठक – दीपक नाईकवाडी (छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड) व भारत वशिष्ठ – सुरेश जाधव (पुणे-बारामती), महिला एकेरी – ऋतिका नायडू (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया) व वैष्णवी गांगारकर (पुणे-बारामती), महिला दुहेरी – विदुला पाटील-चैत्रा पै (कोल्हापूर) व वैष्णवी गांगारकर-कमलरूख दारूखानवाला (पुणे-बारामती), ब्रिज- तेजस शहा- ललितदास देशपांडे (छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड) व अनुप पंडित-विवेक मारोडे (अकोला-अमरावती), कुस्ती – ५७ किलो – संभाजी जाधव (कोल्हापूर) व मतीन शेख (छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड), ६१ किलो – विनोद गायकवाड (अकोला-अमरावती) व शरद मोकळे (छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड), ६५ किलो – राजकुमार काळे (पुणे-बारामती) व योगेश मनोरे (नाशिक-जळगाव), ७० किलो – उत्तम पाटील (कोल्हापूर) व अनंत नागरगोजे (सांघिक कार्यालय-भांडूप), ७४ किलो –जोतिबा आऊलकर (कोल्हापूर) व चंद्रकांत दरेकर (पुणे-बारामती), ७९ किलो – सूरज बल्लाळ (कोल्हापूर) व अमोल मुंगडे (छत्रपती संभाजीनगर-लातूर-नांदेड), ८६ किलो – शिवाजी कोळी (कोल्हापूर) व महेंद्र कोसरे (नागपूर-चंद्रपूर-गोंदिया), ९२ किलो – अमोल गवळी (पुणे-बारामती) व मोहन पेखाळे (नाशिक-जळगाव), ९७ किलो – महेश कोळी (पुणे-बारामती) व मुजाहिद अन्वर (अकोला-अमरावती) आणि १२५ किलो – भानुदास विसावे (नाशिक-जळगाव) व हणमंत कदम (कोल्हापूर).