Lal Salaam Trailer Out: रजनीकांतच्या लाल सलामचा ट्रेलर प्रदर्शित 

रजनीकांत आता 'जेलर'नंतर 'लाल सलाम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतने केले आहे.

0
Lal Salaam Trailer Out
Lal Salaam Trailer Out

नगर : रजनीकांत,(Rajanikant) विक्रांत आणि विष्णू विशाल यांच्या आगामी ‘लाल सलाम’ (laal salam) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे.

नक्की वाचा : अदा शर्माच्या ‘बस्तर द नक्सल स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

रजनीकांतच्या लेकीने केले लाल सलामचे दिग्दर्शन (Lal Salaam Trailer Out)

रजनीकांत ‘जेलर’नंतर ‘लाल सलाम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतने केले आहे. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना ॲक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधील सर्वच कलाकारांच्या अभिनयाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांनी एका गँग लीडरची भूमिका साकारली आहे. धार्मिक सलोखा आणि जातीयवाद यांसारखे मुद्देही चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : ‘केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल’- राहुल गांधी

  तमिळ भाषेमधील ट्रेलरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष (Lal Salaam Trailer Out)

तमिळ भाषेमध्ये चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून २ मिनिट २८ सेकंदाच्या ह्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमध्ये राजकारणात सत्ता, धर्म, क्रोध या गोष्टी कशा प्रकारे परिणाम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा मोईद्दीन भाईच्या जीवनासंबंधीत असल्याचे दिसत आहे. हार्ड हिटिंग स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रजनीकांत यांच्यासोबत क्रिकेटर कपिल देव यांचीही झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘लाल सलाम’ चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here