Movement : राजूरमध्ये आजी-माजी आमदारांचे ठिय्या आंदोलन

Movement : राजूरमध्ये आजी-माजी आमदारांचे ठिय्या आंदोलन

0
Movement

Movement : अकोले : तालुक्यातून जाणार्‍या राजूर पोलीस (Police) ठाण्यासमोरील चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रखडलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने सुरू करावे. या मागणीसाठी आजी-माजी आमदारांसह राजूर ग्रामस्थांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन (Movement) केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नक्की वाचा: मराठा आरक्षणाविराेधातील पाेस्ट तातडीने थांबवा; अन्यथा मनाेज जरांगेंचा कडक शब्दात इशारा

काम आजतागायत रखडले (Movement)


सन २०१८-१९ मध्ये तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारी ते संगमनेर या सुमारे १६५ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ केला होता. रस्त्याचे काम होत असताना राजूर येथील पोलीस ठाण्यासमोरील चौक ते स्मशानभूमी दरम्यानच्या रस्त्याच्या एका बाजूची काँक्रिटीकरण झाले. मात्र, हद्द निश्चित न केल्याच्या आरोपावरून दुसर्‍या बाजूचे काम आजतागायत रखडले आहे.

हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उडवाउडवीचे उत्तरे (Movement)


या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उडवाउडवीचे उत्तरे देत दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. अखेर राजूरकरांनी या कारणास्तव रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड हे या आंदोलनात सहभागी झाले.


यावेळी तहसीलदार डॉ. सिद्धार्थकुमार मोरे, कार्यकारी अभियंता एस. आर. वर्पे, सहायक अभियंता टी. डी. दहिफळे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, सरपंच पुष्पा निगळे, उपसरपंच संतोष बनसोडे, सदस्य गोकुळ कानकाटे, गणपत देशमुख, प्रमोद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, विनय सावंत, पुष्पा लहामटे, रवी पवार, अतुल पवार आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here