Lecture : ‘मुल-मुली आई-वडिलांसाठी’ व्याख्यानाचे आयोजन

Lecture : 'मुल-मुली आई-वडिलांसाठी' व्याख्यानाचे आयोजन

0
Lecture

Lecture : नगर : युवा एकसाथ फाउंडेशन (Yuva Eksaath Foundation) तर्फे नगरमध्ये पहिल्यांदाच युवा परिवर्तन कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार प्रसिद्ध युवा व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे (Vasant Hankare) यांचे मुल-मुली आई-वडिलांसाठी या विषयावरील धडाकेबाज व्याख्यान (Lecture) होणार आहे. हे व्याख्यान नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होईल.

गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे कार्य (Lecture)

नक्की वाचा: मराठा आरक्षणाविराेधातील पाेस्ट तातडीने थांबवा; अन्यथा मनाेज जरांगेंचा कडक शब्दात इशारा

युवा एकसाथ फाउंडेशन हे महाराष्ट्रातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे कार्य करत आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे युवकांचे संघटन करून आदर्श विचारांचे युवक निर्माण करायचे कार्य करत आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्वजण मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्याचा परिणाम मुलांच्या वर्तणुकीवर होत आहे. या बदलत्या परिस्थितीत पालकांनी मुलांना कसे संस्कार करावेत, सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा हे या व्याख्यानातून सांगण्यात येणार आहे. ‘आय लव्ह नगर’ हे या कार्यक्रमाचे डिजिटल पार्टनर आहे.

दिव्यांगांना मोफत व्हील चेअर वाटप (Lecture)

हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक

या कार्यक्रमाच्या वेळी युवा एकसाथ फाउंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तींना मोफत व्हील चेअर वाटप करण्यात येणार आहे. यातून दिव्यांग बांधवांना मदत करण्याचा हेतू आहे. तसेच या वेळी रक्तदान शिबिरही होणार आहे.

Lecture

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here