Main Atal Hoon : पंकज त्रिपाठींच्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज 

Main Atal Hoon : 'मैं अटल हूं' या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याच जीवनावर आधारित आहे.

0
अभिनेते पंकज त्रिपाठींच्या 'मैं अटल हूं' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

नगर : हिंदी मनोरंजन सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित (Trailer Out) झाला आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारली आहे. या ट्रेलरमधील पंकज त्रिपाठी यांच्या डायलॉग आणि अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

नक्की वाचा : मधुमेही रुग्णांना आता स्वदेशी इन्सुलिन मिळणार  

 ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याच जीवनावर आधारित आहे. अटलबिहारी वाजपेयी हे शिक्षण, विज्ञान, पायाभूत सुविधा आणि जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. ‘मैं अटल हूं’या चित्रपटात अटलजींचा संघर्ष, त्यांचा उदय आणि देशाला इतर कोणाच्याही समोर ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.मराठमोळे चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

अवश्य वाचा : ‘8 दोन 75’, फक्त इच्छाशक्ती हवी !” चित्रपटाचा टीझर प्रदर्शित 

‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट मुंबईत अभिनेते पंकज त्रिपाठी, चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते विनोद भानुशाली आणि निर्माते संदीप सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पंकज त्रिपाठी म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे त्यांच्यासाठी सोपे काम नव्हते. कारण त्यांना अटलजींची भूमिका साकारताना मिमिक्री करायची नव्हती.

दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, लहानपणापासूनच मी अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रेरणादायी प्रवास आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा साक्षीदार आहे. देशाच्या या महान नेत्याची कहाणी सांगण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी अत्यंत आभारी असल्याचं म्हणत त्यांचा उल्लेखनीय प्रवास पाहण्यासाठी जग प्रतिक्षा करू शकत नसल्याचं रवि जाधव म्हणाले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला कमेंट करुन अनेकजण पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट १९ जानेवारी २०२३ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here