Majhi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची भाऊबीजही गोड होणार

Majhi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची भाऊबीजही गोड होणार

0
Majhi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची भाऊबीजही गोड होणार
Majhi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची भाऊबीजही गोड होणार

Majhi Ladki Bahin Yojana : नगर : राज्यातील महिलांना आत्मनिर्भर (Independent women) बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात (Health and Nutrition Diet) सुधारणा करणे, या सर्व बाबींचा विचार करून सरकारने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. मागील महिन्यात १ कोटीपेक्षा अधिक भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे  ३ हजार रुपये जमा झाल्यानंतर उशिरा अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच ३ महिन्यांचा लाभ एकत्रित जमा करण्यात येणार आहे.

नक्की वाचा: डीजे मुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी होतेय : आमदार तांबे

पात्र महिलेला दरमहा १ हजार ५०० रूपये (Majhi Ladki Bahin Yojana)

पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बॅंक खात्यात दरमहा १ हजार ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे १ हजार ५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र असतील. २ लाख ५० हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल मात्र कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल, त्यांनी उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही. १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

अवश्य वाचा: पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा; आयुक्तांचे आवाहन

या महिला असणार पात्र (Majhi Ladki Bahin Yojana)

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्जाची प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक, वयासाठी व रहिवाससाठी – जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकेची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 ज्या लाभार्थ्यांस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. राज्य शासनाने या योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यास मान्यता दिली आहे. मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.

Majhi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची भाऊबीजही गोड होणार
Majhi Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनानंतर लाडक्या बहिणीची भाऊबीजही गोड होणार

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभ लाभला आहे. गावपातळीवरील महिलांचा योजनेत समावेश करण्यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटकाने ग्रामपातळीपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. योजनेचा लाभ बँकेत जमा होण्यासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले जाणे गरजेचे आहे. याबाबत महिला व बालविकास विभागातर्फे महिलांना माहिती देण्यात येत आहे. महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलै २०२४ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूदही शासनाने केली आहे. त्यामुळे ही योजना महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्ह्यात ११ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र
जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख २२ हजार २०४ महिला भगिणींचे अर्ज पात्र ठरले आहेत. यात अकोले- ७४ हजार ६५६, संगमनेर- १ लाख २७ हजार ७८०, कोपरगाव- ७३ हजार ७५५, श्रीरामपूर ७१ हजार ९३८, नेवासे ९१ हजार ५५०, शेवगाव ५८ हजार ८१८, पाथर्डी ६१ हजार ५१९, जामखेड ४० हजार ७८२, कर्जत ५९ हजार २२०, श्रीगोंदे ७६ हजार ४८९, पारनेर ६७ हजार ६९२, नगर १ लाख २० हजार ९६५, राहुरी ८४ हजार १९८, तर राहाता तालुक्यातून १ लाख १२ हजार ८४२ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत