Manoj Jarange : घराबाहेर पडा, मुंबईला चला; मनाेज जरांगेंचा मार्ग ठरला 

Manoj Jarange : घराबाहेर पडा, मुंबईला चला; मनाेज जरांगेंचा मार्ग ठरला

0
Manoj Jarange : घराबाहेर पडा, मुंबईला चला; मनाेज जरांगेंचा मार्ग ठरला
Manoj Jarange : घराबाहेर पडा, मुंबईला चला; मनाेज जरांगेंचा मार्ग ठरला

Manoj Jarange : नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवालीतून मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग जाहीर केला आहे. अंतरवाली ते मुंबई पायी प्रवासासाठी सकल मराठा समाज (Maratha society) सज्ज झाला आहे. २० जानेवारीला सकाळी ९ वाजता मराठा बांधव अंतरवालीतून निघणार आहे. जालना, शहागड, गेवराई (बीड), अहमदनगर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खराडी, शिवाजीनगर, पुणे त्यानंतर पुढे पुणे, मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहचणार आहे. 

नक्की वाचा : नगरमध्ये स्वच्छतेविषयी आगळी वेगळी स्पर्धा

मराठा आंदाेलक मनाेज जरांगे म्हणाले, ”सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासात सहभागी व्हावं. सर्व मराठा बांधवांपर्यंत मोर्चाचा मार्ग पोहचवला जाईल. सर्व मराठा समाजाने घराबाहेर पडा. आपल्या मराठा मुलांना आरक्षण देण्याची ही शेवटची वेळ आहे. आपल्या लेकरांसाठी लढायचं आहे. शक्य असेल तितके साहित्य सोबत घ्या. शेकडो गाव एकत्र येऊन आपली व्यवस्था करणार आहे. मुंबईतील मराठा समाजाने आम्हाला मदत करा. प्रत्येकाने नेमून दिलेल्या तुकडीसोबतच राहा. आंदोलनात कुणीही व्यसन करु नये. २० जानेवारीला मुंबईकडे निघू ते आरक्षण घेऊनच येऊ. देशाने कधी बघितलं नसेल असे आंदोलन करायचे आहे. सण, उत्सव नंतर साजरे करु पण आता फक्त आरक्षण हेच ध्येय आहे. आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. वेगळं आरक्षण टिकणार नाही. सरकारला कायदा करण्यासाठी भरपूर पुरावे मिळाले आहे. कसं आरक्षण देत नाही हे बघतोच. आनंदात जायचे आणि आनंदात आरक्षण घेऊन यायचं आहे.”

हे देखील वाचा : जाणून घ्या येणाऱ्या नवीन वर्षात किती असणार सुट्ट्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here