Manoj Jarange Patil : आता भगवं वादळ मुंबईत धडकणारच; मनोज जरांगे यांना हायकोर्टाचा दिलासा

0
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : नगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. समस्त मराठा बांधवांसह मुंबईला जाऊन आंदोलन करण्याचा निर्धार केलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) २० जानेवारीला अंतरवली सराटीमधून सुरुवात करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळण्यात आली आहे.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणावर अजय महाराज बारस्करांनी सांगितला तोडगा

याचिकेवर सुनावणी (Manoj Jarange Patil)

Manoj Jarange
Manoj Jarange


आज या जनहित याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी प्रशासनाची असून, कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही, असं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधातील जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला आहे.

नक्की वाचा : सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवलेल्या गोष्टी, राहुल नार्वेकरांनी ठरवल्या वैध

कोर्टाचा नकार (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये, याचिकेतून मागणी आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून हायकोर्टात केली होती. आझाद मैदानसह, बीकेसीत आणि शिवाजी पार्क मध्येही आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांकडे मागितल्याची माहिती आहे. मनोज जरांगे 20 जानेवारी रोजी आंतरवली सराटी येथून निघून, 22 जानेवारीपर्यंत मुंबई दाखल होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. जरांगेंच्या वतीनं आझाद मैदान, एमएमआरडीए आणि शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाची परवानगी मागत मुंबई पोलिसांकडे अर्ज केला. लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणून कायदा सुव्यस्था बिघडवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला होता. तसंच अंतरवाली सराटीत झालेल्या हिंसक आंदोलनाचाही याचिकेत उल्लेख केला होता. पण कोर्टाने याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here