जालना : “माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून, अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचा गौप्यस्फोट (Secret Explosion) मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असतांना सालेर किल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो, पण याला आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत.
नक्की वाचा : माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह व डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर
मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार (Manoj Jarange)
मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून, या काळात आपण ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राजपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
अवश्य वाचा : अभिनेत्री तितीक्षा तावडे बांधणार दृष्यम-२ फेम अभिनेत्यासोबत लग्नगाठ
याचवेळी बोलतांना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून,अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी यांना माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.