IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे.

0
IND vs ENG
IND vs ENG

नगर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची (India National Cricket Team) घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध (England Team) टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आतापर्यंत कसोटीतील दोन सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील एक सामना इंग्लंडनं, तर एक सामना टीम इंडियानं जिंकला आहे. आता पुढच्या तीन सामन्यांच्या निकालावर कसोटी मालिकेच्या विजयी संघाची घोषणा होणार आहे.

नक्की वाचा : एकनाथ शिंदे सरकारी पैशाने गुंडांना पोसतात : संजय राऊत

राहुल-जडेजाची एन्ट्री पण विराट कोहलीची एक्झिट (IND vs ENG)

मागील दोन सामन्यात दिग्गज खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला उर्वरित तीन सामन्यांत काहीसा दिलासा मिळणार आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा आणि स्टार फलंदाज केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. पण टीम इंडियाची रनमशीन असलेला दिग्गज विराट कोहली याने मात्र, इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमधून ब्रेक घेतला आहे.  वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली उर्वरित सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

अवश्य वाचा : माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरण सिंह व डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर  

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोन्ही मोठ्या खेळाडूंचं इंग्लंडविरुद्धच्या संघात पुनरागमन झालं आहे. मात्र तस असलं तरीसुद्धा फिटनेस टीमच्या मंजुरीनंतरच दोघांच्या सहभागाबाबतचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच, जडेजा आणि राहुल संघात परतले असले तरी ते खेळतील की, नाही हे अजून निश्चित नाही. वेगवान गोलंदाज आवेश खानला स्क्वॉडमध्ये जागा मिळालेली नाही. पुढच्या तीन कसोटी सामन्यांसाठी निवडलेल्या संघामधून आवेश खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निवड समितीनं शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकाश दीपची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ (IND vs ENG)

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here