Manoj Jarange : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय; मनाेज जरांगेंची नाव न घेता सडकून टीका

0
340

नगर : राज्यातल्या एका उपमुख्यमंत्र्यांना काड्या करायची सवय आहे. एक उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) चांगलाच कलाकार आहे. त्यांच्याकडे बघावे लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव न घेता संघर्ष याेद्धा मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सडकून टीका केली आहे.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणासाठी अकोले तालुक्यात कडकडीत बंद

अंतरवाली सराटीतून मनाेज जरांगे पाटील हे माध्यमांशी बाेलत हाेते. जरांगे पाटील म्हणाले, ”सरकारने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. त्यामुळे रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही, तर मी जलत्याग करणार आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा. सरकारनं जाती एकमेकांच्या अंगावर घालणं बंद करा. असं वागल्यावर पंतप्रधान माेदी पुन्हा पंतप्रधान हाेईल का? लवकरात लवकर सरकारनं विशेष अधिवेशन बाेलवून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. एकामागून एक बैठका बाेलवल्या जात आहे. बैठका घेऊन काय करता, नुसत्याच भाकरी खाऊन वेळ मारून नेण्याचे काम करीत आहे.

नक्की वाचा : अर्धवट आरक्षण नकाे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट संदेश

काही वेळापूर्वी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असल्याचे समजते. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम दिला आहे. किती दिवसात मराठा आरक्षण देणार ते सांगा, त्रास दिल्यास जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच जरांगे पाटील यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक अधिक जबाबदार राहतील. एकाला काड्या करण्याची जास्त सवय असल्याची घणाघाती टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे आता जरांगे पाटलांचा रोख नेमका कोणावर? अशी चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसा करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता जरांगे पाटील यांनीही थेट इशारा दिला आहे. गुन्हा दाखल केल्यास स्वत: बीडला जाणार असल्याचा इशारा दिला. त्यांना आयुष्यात दुसरं काय आलं?  घरं कोणी जाळले आम्हाला माहिती नाही, भाजप तुमच्यामुळेच संपायला आलं, आमच्या पैशावर बासुंदी ,गुलाबजामुन खाता, करा काय करायचे ते करा, ३०७ करायचे ते करा? असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. तर मी बीडमध्ये कलेक्टर, एसपी कार्यालयासमोर दहा लाख आंदोलक घेऊन बसेल. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला, तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असे मनाेज जरांगे पाटील म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनानं हिंसक रुप घेतल्यानं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला फोन केल्यानंतर इंटरनेट सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.