नगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना ते कस द्यावे यावर आज मनोज जरांगे (Manoj jarange) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जरांगे म्हणाले आहे.
नक्की पहा : ग्रामपंचायत निवडणूक : आम्हीच नंबर वन; राजकीय पक्षांचे दावे, प्रतिदावे
ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं अप्रत्यक्षपणे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून आता ओबीसी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण घेताना राजकीय आरक्षण घ्यायचं की नाही या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, “आमचं जे काही हक्काचं आहे ते आम्हाला मिळणारच. मात्र, मराठा आरक्षणाला विरोध करणारांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहे. आमचं हक्काचं आहे त्यामुळे आम्ही आमचा हक्क का सोडायचा असं जरांगे म्हणालेत.
हेही पहा: कुणबी नाेंदी शाेधण्यासाठी जिल्ह्यात विशेष माेहीम सुरू; १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची हाेणार पडताळणी
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी आमचा कोणत्या कारणासाठी विरोध आहे असं त्यांनी स्पष्ट करावं. आमचं जे काही आहे, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे. जे काही ओबीसींना मिळते, ते सर्व काही आम्हाला मिळालं पाहिजे, असे जरांगे म्हणाले आहेत.