Manoj Jarange Movie : मनोज जरांगेंचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर येणार 

Manoj Jarange Movie : मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनाचा वेध 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं आहे.

0
Manoj Jarange Movie
Manoj Jarange Movie

नगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनाचा वेध ‘संघर्षयोद्धा’ (Sangharshyoddha) मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालं आहे. याप्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम यांची उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नक्की वाचा : एमपीएससीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर; विनायक पाटील राज्यात प्रथम

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणार रोहन पाटील (Manoj Jarange Movie)

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे “संघर्षयोद्धा”- मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे, सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

अवश्य वाचा : देशात मोदी व राज्यातही पुन्हा डबल इंजिन सरकार बनणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

“एक मराठा, लाख मराठा” म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे (Manoj Jarange Movie)

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी “एक मराठा, लाख मराठा” म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर  मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील आघाडीवर आहे. आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे.

अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या  चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर  लवकरच येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here