Maratha society : कोपरगावात सकल मराठा समाजाचा जल्लोष

Manoj Jarange Patil

0
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Maratha society : कोपरगाव : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या संघर्षाला अभूतपूर्व यश आले आहे. महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने सर्वत्र मराठा समाजाच्या (Maratha society) वतीने मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : अध्यादेशाला धाेका झाल्यास आझाद मैदानावर आलाेच म्हणून समजा; मनाेज जरांगेचा इशारा

मराठा समाजाच्या सोबत जल्लोष (Maratha society)

कोपरगाव शहरात माजी आमदार अशोक काळे,  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाजाच्या सोबत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

नक्की वाचा : वकील दाम्पत्याचा खंडणीसाठी केला खून; चार जण पोलिसांच्या ताब्यात

ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी (Maratha society)


यावेळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. एकमेकांना पेढे भरवत गाण्याचा तालावर ठेका धरत भगव्या गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसणाऱ्या आंदोलनकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सकल मराठा समाज बांधव,नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here