Manoj Jarange Patil : नगर : आरक्षण (Reservation) हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटला की, मी धनगर आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण कसं देत नाहीत तेच बघताे, असं मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितले.
हे देखील वाचा : गुन्हेगारांचे बळ वाढू नये, यासाठी पोलिसांना विशेष सूचना : राधाकृष्ण विखे पाटील
जरांगे पाटील आज किल्ले रायगडच्या दाैऱ्यावर (Manoj Jarange Patil)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज किल्ले रायगडच्या दाैऱ्यावर आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर किल्ले रायगडावर मनोज जरांगे पाटील आशिर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अवश्य वाचा : नगर अर्बन घाेटाळाप्रकरणी अशाेक कटारिया यांना अटक; न्यायालयाने सुनावली सात दिवसांची काेठडी
आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न (Manoj Jarange Patil)
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर धनगर, मुस्लिम त्यांच्यासाठी लढा देणार असं अनेकदा म्हटलं आहे. याबाबत आज माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी प्रश्न केला असता जरांगे म्हणाले, आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. हा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, धनगर आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण कसं देत नाहीत, तेच बघतो. त्यांचाही प्रश्न सुटला पाहिजे, असं माझं मत आहे.
नक्की वाचा: काँग्रेसकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही : प्रफुल्ल पटेल