Manoj Jarange Patil : नगर : लाेकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विराेध करणाऱ्यांना पूर्ण ताकदीने पाडा. निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला माेठा विजय असणार आहे, असे आवाहन मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाज बांधवाना केले आहे.
हे देखील वाचा: देशाच्या भल्यासाठी या सरकारने काहीच केलेले नाही : शरद पवार
जरांगे म्हणाले
”सर्वांनी आमचं वाटोळं केलं आहे. परंतु, तरीही लाेकशाहीचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. आपला उमेदवार निवडणुकीत नसल्यामुळे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांना मतदान करा. तसेच जे मराठा आरक्षणाच्या विरोधकात आहेत, त्यांना इतक्या ताकदीने पाडा की, त्यांच्या कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने मराठ्यांनी एकजूट दाखवावी.”
नक्की वाचा : तब्बल एक तपानंतर चोरीला गेलेले दागिने मिळाले; शिक्षिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले
मनोज जारांगेंनी बजावला मतदानाचा हक्क (Manoj Jarange Patil)
आज राज्यातील आठ जागांवर मतदान पार पडत आहे. मनोज जरांगे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. विशेष म्हणजे प्रकृती अस्वास्थामुळे जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णवाहिकेतून जालन्यात पोहचून त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.