Lok Sabha Elections : अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार

Lok Sabha Elections : अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार

0
Lok Sabha Elections
Lok Sabha Elections : अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार

Lok Sabha Elections : नगर : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगर लाेकसभा मतदारसंघातून चक्क महाविकास आघाडीचे उमेदवार (Candidate) नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावात साधर्म्य असलेल्या आणखी एका व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. नगरमध्ये दाेन नीलेश लंके (Nilesh Lanke) लाेकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) रिंगणात उतरल्याने निवडणुकीत आणखी ट्वीस्ट निर्माण झाला आहे.  

हे देखील वाचा: देशाच्या भल्यासाठी या सरकारने काहीच केलेले नाही : शरद पवार

प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग (Lok Sabha Elections)

लाेकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला जास्तीत-जास्त मते मिळावीत, यासाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. यामध्ये विविध खेळ्या केल्या जात आहेत. नीलेश साहेबराव लंके असं अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. नगरमध्ये महायुतीचे डॉ. सुजय विखे पाटील, महाविकास आघाडीचे नीलेश लंके, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप खेडकर, एमआयएमचे परवेज शेख उभे आहेत.

नक्की वाचा : तब्बल एक तपानंतर चोरीला गेलेले दागिने मिळाले; शिक्षिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले

उमेदवारांची संख्या पोहचली ४३ वर (Lok Sabha Elections)

निवडणुकीच्या या रिंगणात आता अपक्ष उमेदवार म्हणून नीलेश साहेबराव लंके यांनी देखील उडी घेतली आहे. नगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली हाेती. शेवटच्या दिवशी नगरमधून २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशनपत्र दाखल केलेत. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या ४३ वर पोहचली आहे. दाखल झालेल्या अर्जाची आज छाननी होणार आहे.

शिर्डीतही नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल

शिर्डी लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तीने गुरुवार (ता. २५) शिर्डी लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेल्या व्यक्तीचे नाव भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे असे आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा निवडणुकीत आणखी रंगत पाहायला मिळणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here