Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास हायकाेर्टाचा नकार; गुणरत्न सदावर्तेंची मागणी फेटाळली

Manoj Jarange Patil : नगर : मनाेज जरांगे पाटील यांची पदयात्रा प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी मुंबईत धडाकणार आहे.

0
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : नगर : मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी मुंबईत धडाकणार आहे. मुंबईत येण्यापासून मनोज जरांगे पाटील यांना रोखले नाही, तर मुंबई (Mumbai) ठप्प होईल, अशी भीती वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी बुधवारी उच्च न्यायालयात (High Court) व्यक्त केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली होती. त्यानंतर मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे मराठ्यांचं भगवं वादळ प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारी धडकणार असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले.

Manoj Jarange Patil

नक्की वाचा: आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे पाटील

राज्य सरकारला नाेटीस (Manoj Jarange Patil)

मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीला मुंबईत दाखल होऊन ते आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोवर मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र, हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान कोर्टाने मनोज जरांगे पाटील, आझाद मैदान पोलीस आणि राज्य सरकारला नोटीस बजावली होती. सुनावणीदरम्यान, राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनीही मनोज जरांगे यांचे हे आंदोलन रोखण्याचा न्यायालयाला अधिकार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यास नकार दिला.

Manoj Jarange Patil

हे देखील वाचा : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

नव्या जागेचा विचार करा (Manoj Jarange Patil)

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. रस्ते अडवले जाऊ नयेत, यासाठी राज्य सरकार योग्य त्या उपाययोजना करू शकते. जरांगे पाटील हे न्यायालयासमोर नाहीत. त्यामुळे, त्यांच्याविरोधात कोणतेही आदेश दिले जाऊ शकत नाहीत. असे असले तरी मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मुभा राज्य सरकारला असेल, असे कोर्टानं म्हटलं आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच हजारांची आहे. त्यामुळे, आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आंदोलनाकरिता नव्या जागेचा विचार करा, असेही कोर्टानं म्हटलं आहे.

अवश्य वाचा : रामदास आठवलेंचा नगर दाैऱ्याआधी आरपीआय गटात घमासान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here