नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची (Hunger Strike) तारीख जाहीर केली आहे. २९ ऑगस्टला मुंबईत धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले,सरकारकडे मराठा बांधवांनी समजून घ्या असं म्हणायचं कारणच येत नाही. त्यामुळे आपल्याला मुंबई सोडायचा प्रश्न येत नाही.
नक्की वाचा : मोठी बातमी!१ मे पासून एटीएममधून पैसे काढणं महागणार
आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो.योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. मी उपोषण करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास,असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
अवश्य वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण;’या’ मान्यवरांची वर्णी
‘मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघणार नाही’ (Manoj Jarange)
ते पुढे म्हणाले की,दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत. मागील उपोषण सोडताना चार मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल,असे सांगितलं होतं.आज तीन महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात, संयम तरी किती दिवस धरायचा. २९ ऑगस्ट २०२५ ला आम्ही मुंबईत जाणार आहे. मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे.
मनोज जरांगे मुंबईत करणार उपोषण (Manoj Jarange)
मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी २९ ऑगस्टच्या अगोदर काम आवरून ठेवा.आता माघारी यायचं नाही, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे. सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली,असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, हक्काचा आहे ते आम्हाला द्या. कोणी विरोध केला तरी ते आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या ते रोखू नका,असं आवाहन देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे, या दोन ठिकाणावरती उपोषण करणार आहे. शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही,असंही त्यांनी सांगितलं आहे.