नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला यश आलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व अटी मान्य करत अधिसूचना काढत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिलं होतं. आता याच मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन (Special session) घेण्यात येणार आहे.
नक्की वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जाहीर
विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार (Maratha Reservation)
विधानसभेच्या या विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाऊ शकते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने अधिसूचना आणली असून त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. हरकतींचा विचार करुन विधेयक अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : मुंबई काँग्रेसला धक्का;बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम
१० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे आमरण उपोषण करणार (Maratha Reservation)
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन आणले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी दिली होती. तरीही येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून ते हे आमरण उपोषण करणार आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.