Sujay Vikhe Patil : खासदार सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू   

Sujay Vikhe Patil : खासदार सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू

0
Shri Ram

Sujay Vikhe Patil : नगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना (Shri Ram) चरणी अर्पण केले.

हे देखील वाचा : आसाराम बापूंची सुटका करा; भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानसह, छावा, वारकरी संघटनेची मागणी

जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण (Sujay Vikhe Patil)

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती. या साखरेपासून लाडू बनवून २२ जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत, असे आवाहन त्यांनी नगर जिल्ह्यातील समस्त नागरिकांना केले होते. दरम्यान, नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले आहे. माता भगिनींनी इतक्या आपुलकीने बनवलेला हा प्रसाद प्रभू श्रीरामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद होत आहे. माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय असा क्षण असल्याचे मी समजतो, असे मत खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

Shri Ram

नक्की वाचा: मुंबई काँग्रेसला धक्का;बाबा सिद्दीकींचा पक्षाला रामराम

सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना (Sujay Vikhe Patil)


मला विश्वास आहे की, या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील, असे सांगून त्यांनी सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना प्रभू श्रीरामांच्या चरणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here