Maratha Reservation : मराठा आरक्षणाविराेधातील पाेस्ट तातडीने थांबवा; अन्यथा मनाेज जरांगेंचा कडक शब्दात इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविराेधातील पाेस्ट तातडीने थांबवा; अन्यथा मनाेज जरांगेंचा कडक शब्दात इशारा

0
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : नगर : मुंबईच्या आंदाेलनानंतर साेशल मीडियावर (Social media) काही विघ्नसंताेषी लाेकांकडून मराठा आरक्षणाविराेधात पाेस्ट टाकण्याचा उद्याेग सुरू आहे, अशा लाेकांना मराठा आरक्षण (Maratha Reservation) लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. हे लोक कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या नेत्याचे आहेत. हे आपल्याला माहिती असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढच्या दाेन-चार दिवसात हा उद्याेग थांबवला नाही, तर ते लाेक काेणत्या पक्षाचे आहेत आणि काेणत्या नेत्याचे आहेत. हे मी जाहीर करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.

Manoj Jarange Patil

हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक

जे मागच्या ७०-७५ वर्षांमध्ये झालं नाही ते आता होत आहे (Maratha Reservation)


जालन्यातल्या आंतरवाली सराटी येथे आज पत्रकार परिषदेत बाेलताना ते म्हणाले, ”सध्या कुणबीच्या ५७ लाख नोंदी सापडलेल्या असून ३९ लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे, हे या आंदोलनाचं यश आहे. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. सरकारकडून प्रमाणपत्र देण्याचं काम सुरु आहे. जे मागच्या ७०-७५ वर्षांमध्ये झालं नाही ते आता होत आहे.

नक्की वाचा: दुसऱ्या कसोटीत भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा ;बुमराह-अश्विनचा भेदक मारा

१० तारखेपासून मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार (Maratha Reservation)

सगेसोयऱ्यांच्या बाबतीत सरकारने १५ तारखेला अधिवेशन बोलावलं आहे. त्यानुसार मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी १० तारखेपासून मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. यापूर्वी मी समाजासाठी मरायला तयार हाेताे आजही मरायला तयार आहे.  माझ्यामागे काही अदृष्य हात आहेत, असा आरोप केला जात आहे. अगोदर शरद पवार यामागे आहेत, असं म्हटलं जायचं. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव पुढे आलं. मागच्या पुण्याईवर मी जगत नाही. तुम्ही इथे येऊन संघर्ष करा, शासनाने काढलेल्या अधिसूचनेशी संबंधित काही सूचना करायच्या असतील, तर त्या कराव्यात, विनाकारण चुकीचा मेसेज देऊ नये,” असे जरांगे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here