Navra Maza Navsacha part 2 :‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार

तब्बल १९ वर्षांनी निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

0
Navra Maza Navsacha part 2
Navra Maza Navsacha part 2

नगर : मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा सदाबहार चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने जवळपास दोन दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य केल आहे. आजही या चित्रपटातील प्रत्येक संवाद व गाणी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग (Second Part) येणार आहे.

नक्की वाचा : ‘भक्षक’मध्ये सई ताम्हणकर साकारणार पोलिसाची भूमिका   

‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग येणार (Navra Maza Navsacha part 2)

१९ वर्षांनंतर निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.पहिल्या चित्रपटात आपल्याला गणपती पुळेच्या सहलीची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घडलं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार ? यामध्ये कोणकोणते ट्विस्ट येणार याचा उलगडा थेट चित्रपटगृहात होणार आहे. परंतु, तत्पूर्वी या चित्रपटातील तगड्या कलाकारांची  नावं समोर आली आहेत.

अवश्य वाचा :  झारखंडमध्ये चंपई सोरेनच मुख्यमंत्री

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात ‘हे’ कलाकार साकारणार महत्वाची भूमिका (Navra Maza Navsacha part 2)

चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक तसेच प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून कलाकारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे.सचिन पिळगावकरांनी दुसऱ्या भागाची घोषणा करताच या चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. नेटकऱ्यांनी त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here