Maratha Reservation : नेत्यांच्या फोटोला जोडे मारुन फासले काळे 

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी घ्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे केले जाईल, भविष्यातील आंदोलन सरकारला झेपणार नाही व मराठा समाज बांधव सरकारची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला.

0
382

राहाता : राहात्यात मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस वर असणाऱ्या शासकीय जाहिरात फलकावरील पंतप्रधान (Prime Minister), मुख्यमंत्री (Chief Minister), उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर नेत्यांच्या फोटोला काळे फासले व जोडे मारले. त्यानंतर या सरकारचा निषेध नोंदवत मराठा आरक्षण प्रश्नी लवकर निकाल द्या व मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांच्या प्रकृतीची काळजी घ्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे केले जाईल, भविष्यातील आंदोलन सरकारला झेपणार नाही व मराठा समाज बांधव सरकारची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला.

हे देखील वाचा : उपसमितीला ११,५३० कुणबी नोंदी सापडल्या; उद्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार : मुख्यमंत्र्यांची माहिती

राहाता शहरातील व तालुक्यातील अनेक समाज बांधव ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरासमोर एकत्रित जमा झाले. त्यानंतर पायी बसस्थानकाकडे चालत गेले. एसटीला थांबवत प्रत्येक एसटीवरील नेत्यांच्या फोटोला काळे फासून त्या फ्लेक्सवर जोडे मारले.  राहाता शहर व तालुका बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन बंद शंभर टक्के यशस्वी केला. समाज बांधवांनी यावेळी सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदवताना नेत्यांच्या विरोधात घोषणा देत आरक्षण लवकर द्या, अन्यथा सरकारला भविष्यातील आंदोलने परवडणार नाही, अथवा झेपणार नाही असा खणखणीत इशारा यावेळी दिला.

नक्की वाचा : विश्वचषकात भारताचा वारू सुसाट

राहाता शहरासह परिसरातील अनेक गावांनी आपले व्यवहार बंद ठेवून या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसला थांबवून नेत्यांच्या फोटोला काळे फासले व जोडे मारले. यावेळी बसमधील प्रवाशांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु राहाता शहरातील समाज बांधवांच्या वतीने अत्यंत शांततेत व कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेत आंदोलन केले गेले. आम्ही कुठल्याही प्रकारचे विध्वंसक आंदोलन करणार नाही. मात्र, जर सरकारने प्रश्न लगेच मार्गी लावला नाही आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाचा अंत पाहिला तर यापुढे सरकारला मराठा समाज माप करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सर्व सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here