Meher Baba : नगर : कराराची अंतिम मुदत आठ महिन्यांपूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे (Assistant Labor Commissioner) पगारवाढीच्या नवीन करारावर सुरू असलेल्या सुनावणीत सात ते आठ तारखा होऊन देखील तोडगा निघालेला नाही. त्यामुळे लाल बावटा जनरल कामगार युनियन (Lal Bawata General Workers Union) संलग्न अवतार मेहेरबाबा (Meher Baba) कामगार युनियनतर्फे आज (मंगळवारी) पासून वाडियापार्क येथील महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले. उपोषणात सहभागी कामगारांनी मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढे पगारवाढ देण्याची एकमुखी मागणी केली.
हे देखील वाचा : वाढत्या कोरोनामुळे देवेंद्र फडणवीसांनी केले हे आवाहन
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन युनियनच्या कामगारांनी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाकपचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, लाल बावटाचे सचिव ॲड. सुधीर टोकेकर, सुरेश पानसरे, युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सचिव विजय भोसले, अनिल फसले, प्रवीण भिंगारदिवे, सुनील दळवी, सुनिता जावळे, राधाकिसन कांबळे, सुभाष शिंदे, प्रभावती पाचरणे आदींसह युनियनचे पदाधिकारी, कामगार व महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
नक्की वाचा : श्रीगोंदे बाजार समिती मधील बंद असलेली कांदा खरेदी सुरू
यावेळी नवीन करार तात्काळ करुन पगार वाढ मिळण्यासाठी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या तीन वर्षाच्या कराराची मुदत ३१ मार्चला संपली आहे. युनियन व ट्रस्टमध्ये पुढील तीन वर्षांसाठी करार होण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुनावणी सुरु आहे. २०२० मध्ये झालेल्या करारात कामगारांना ४७५० रुपयांची पगारवाढ देण्यात आली होती. महागाईच्या काळात कामगारांना जीवन जगणे अशक्य झाले असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मागील वेळी दिलेल्या ४७५० पुढे वेतनवाढ मिळाल्यास कामगारांची सहमती असणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर ट्रस्टने तीन टक्क्यांची दिलेली पगारवाढची ऑफर कामगारांनी नाकारली आहे.