Bus accident : बस पुलावरून कोसळली; प्रवासी थोडक्यात बचावले

Bus accident : बस पुलावरून कोसळली; प्रवासी थोडक्यात बचावले

0
Bus accident : बस पुलावरून कोसळली; प्रवासी थोडक्यात बचावले
Bus accident : बस पुलावरून कोसळली; प्रवासी थोडक्यात बचावले

Bus accident : संगमनेर : कोळेवाडी येथे मुक्कामी गेलेली बस (Bus) पुन्हा सकाळी संगमनेरकडे खांबा, वरवंडी, शिबलापूर, हंगेवाडीमार्गे संगमनेरला येत असताना पिंपरणे पुलावरून बस खाली कोसळली (Bus accident). या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी (passenger injured) झाले आहेत.

हे देखील वाचा : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज

 
कोळेवाडी येथे परिवहन महामंडळाची बस मुक्कामी गेली होती. शिबलापूरमार्गे प्रवाशी घेत येत असताना आज (ता.२६) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पिंपरणे येथे आल्यावर बसचा एक्सल तुटला आणि बस पुलावरून खाली पलटी झाली. बसमधील चालक, वाहक व काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली व जखमींची चौकशी केली. जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आले.

हे देखील वाचा : वाढत्या कोरोनामुळे देवेंद्र फडणवीसांनी केले हे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here