Beating : युवकाकडून बसचालकाला मारहाण

Beating : युवकाकडून बसचालकाला मारहाण

0
Beating : युवकाकडून बसचालकाला मारहाण
Beating : युवकाकडून बसचालकाला मारहाण

Beating : कर्जत : बस थांबवली नाही म्हणून युवकाने बस चालकास मारहाण (Beating) केल्याची घटना आंबीजळगाव (ता.कर्जत) येथे घडली. सदर युवकावर बस चालकाच्या (bus driver) फिर्यादीवरून कर्जत पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज


फिर्यादी बसचालक संतोष ज्ञानदेव नेवसे (श्रीगोंदा आगार) हे आपल्या ताब्यातील एसटी बस खातगाववरुन कर्जतकडे घेवून येत होते.आंबी जळगाव रस्त्याने येत असतांना पाठीमागून आलेला मोटारसायकल चालक अजिंक्य देविदास रोठे याने त्याची मोटारसायकल एसटी बसला आडवी लावली. एसटी बस थांबवण्यास भाग पाडून ड्रायव्हर साईडचे दरवाजा उघडून शिविगाळ केली. गाडी का थांबवली नाही? असे म्हणत बसचालक संतोष नेवसे यांना मारहाण केली. याप्रकरणी बसचालक नेवसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्याम जाधव हे करीत आहेत.

हे देखील वाचा : वाढत्या कोरोनामुळे देवेंद्र फडणवीसांनी केले हे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here