नगर : आता तुमची हक्काचं घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण म्हाडा (MHADA) आता तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Housing Minister Atul Save) यांनी दिली आहे.
नक्की वाचा : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला
अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती आता कमी होणार आहेत. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहितीही मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सरसकट नाहीतर म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्याच किमती कमी होणार असल्याचं अतुल सावे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे
म्हाडाच्या जवळपास ११ हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. या घरांचं वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्यानं म्हाडाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी मंत्री सावे यांनी सांगितलं आहे. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. नुकसान टाळत महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.