Narendra Firodia : ‘शांतीकुमारजी फिरोदिया’ फाउंडेशन बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध : नरेंद्र फिरोदिया

0
Narendra Firodia : 'शांतीकुमारजी फिरोदिया' फाउंडेशन बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध : नरेंद्र फिरोदिया
Narendra Firodia : 'शांतीकुमारजी फिरोदिया' फाउंडेशन बुद्धिबळाच्या प्रचार, प्रसारासाठी कटिबद्ध : नरेंद्र फिरोदिया

Narendra Firodia : नगर : अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना (Ahmadnagar District Chess Association) व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन हे बुद्धिबळच्या प्रचार व प्रसारासाठी कटिबद्ध आहे. ऑल इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा (Chess tournament) घेतल्यामुळे जास्तीत-जास्त खेळाडूंना रेटिंग मिळेल व त्याचा फायदा होईल. पुढील बुद्धिबळ स्पर्धा मे २०२४ मध्ये घेण्याचा मानस अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आयोजित ऑल इंडिया ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरवार (ता. २३) रोजी करण्यात आले. यावेळी ते बाेलताना म्हणाले, ”बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ४ वर्षांपासून ते ८४ वर्षापर्यंतच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व शांतीकुमार जी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनचा प्रयत्नशील राहील. या स्पर्धेत छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू अनुप देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर हे बुद्धिबळाचे हब निर्माण होत आहे. या स्पर्धेत ३२९ स्पर्धक सहभागी झाले आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. अहमदनगर हे महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र झाले आहे.”

हे देखील वाचा : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे

स्पर्धेत जिल्ह्यातून व राज्यातून आलेल्या सर्व स्पर्धकांचे स्वागत करून आभार मानण्यात आले. तर कार्यक्रमांचे प्रास्ताविक व स्वागत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी केले व या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पहायला मिळाले. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंचा उत्कूष्ट खेळ नगरकरांना पहायला मिळाला. या बक्षीस वितरण समारंभात अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया समवेत अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, श्याम कांबळे, मुख्य पंच प्रवीण ठाकरे, अमरिश जोशी, पवन राठी, यश लोहाना, सोनल तांबे, गायत्री कुलकर्णी, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, देवेंद्र वैद्य, संजय खडके, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, डॉ. स्मिता वाघ, ललिता वैशंपायन आदी उपस्थित हाेते.

स्पर्धेतील मुख्य विजेते.. प्रमुख विजेता गट
प्रथम- श्लोक शरणार्थी, द्वितीय- आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख, तृतीय- ओंकार कडव, चतुर्थ-हर्ष घाडगे, पाचवे- इंद्रजीत महिंदरकर, सहावे- संजीव मिश्रा, सातवे- श्रीराज भोसले, आठवे- सर्वेश खेडेकर, नववे- श्रेयन मुजुमदार, दहावे- अक्षज पाटील, अकरावे- अमेय श्रीवास्तव, बारावे-अमिन मोहम्मद, तेरावे- आलुकिक सिन्हा, चौदावे- राजस डहाळे, पंधरावे- ऋषिकेश कब्नुर्कर.

अहमदनगर मधील विजेते खेळाडू
प्रथम- आशिष चौधरी, दृतिय- आयुष आय्या, तृतीय- गिरीश सरवणकर, चतुर्थ- तन्मय निळे, पाचवे- दीपक सुपेकर, सहावे- सचिन कांबळे, सातवे- रंजीत अथर्व पाटील, आठवे- सुनील जोशी..

सोळाशे मानांकनातील विजेते
प्रथम- बालाजी राव आर्यन, द्वितीय-रवींद्र निकम, तृतीय- सार्थ भोसले, चतुर्थ-विश्वेश श्याम, पाचवे- प्रज्ज्वल आव्हाड, सहावे- रवी पलसुले, सातवे- श्रीराज इंगळे, आठवे- गुरुप्रसाद कुलकर्णी, नववे- आर्यन गद्रे, दहावे- सुदीप पाटील, अकरावे- सतीश अनिरुद्ध, बारावे- नीलेश गिरकर, तेरावे- क्रिशिव शर्मा, चौदावे- अशोक माळी, पंधरावे- कुश आगरवाल.

सात वर्षाखालील विजेते खेळाडू
प्रथम- अन्वित गायकवाड, द्वितीय-वीर जितेश कुमार पटेल, तृतीय- कृष्णा हरीश मुरकुटे, चतुर्थ- स्वरा लड्डा, पाचवे- अन्वी हिंगे.

नऊ वर्षाखालील विजेते
प्रथम- जाॅन कॅलेब, द्वितीय- भूमिका वाघेला, तृतीय- दर्श पोरवाल, चतुर्थ- श्रेयस नलावडे, पाचवे- नैतिक माने, सहावे- सर्वज्ञ बालगुडे, सातवे- नेवान गुप्ता, आठवे-अद्वय धेणे.

तेरा वर्षाखालील विजेते
प्रथम-रमेश कृष्णसाई, दुतीय- कुशाग्र पालीवाल, तृतीय- आदित्य जोशी, चतुर्थ- अर्जुन ठाकूर, पाचवे- अभय चेट्टी, सहावे- आर्जीव प्रभाकर, सातवे- विश्वजीत जाधव, आठवे- ध्रुव पाटील.

महिला विजेते
प्रथम- ईश्वरी जगदाळे, द्वितीय- शर्वरी काभ्णुरकर, तृतीय- श्रावणी उंडाळे, चतुर्थ- अर्पिता तोरस्कर, पाचवे- साक्षी चव्हाण, सहावे- वेदांती इंगळे, सातवे- तन्वी कुलकर्णी, आठवे- देवांशी गवांदे.

ज्येष्ठ खेळाडू विजेते
प्रथम- ओ. पी. तिवारी, द्वितीय- ईश्वर रामटेके, तृतीय- सुरेंद्र सरदार, चतुर्थ- सुभाष श्रीधणकर, पाचवे- नंदकुमार सुरू, सहावे- लक्ष्मण लालगोविंद, सातवे- एस. हरिहरा, आठवे- विजय कुलकर्णी.

बिगर मानांकित विजेते
प्रथम- अथर्व रेड्डी, द्वितीय- विहांग गंगन, तृतीय- अजय कोकाटे, चतुर्थ- कोमाक्षी जोशी, पाचवे- नीलेश तावडे, सहावे- सुशांत यादव, सातवे- आदर्श पाटील, आठवे- सक्षम मंगेश जोशी.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले, तर आभार खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here