MI vs KKR : मुंबईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात; मुंबईचा KKR कडून पराभव 

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्याने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाचं आव्हान संपलं आहे.

0
MI vs KKR
MI vs KKR

नगर : आयपीएल २०२४ (IPL 2024) मधील मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकाता (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्याने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाचं आव्हान संपलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर शनिवारी (ता.३) पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा दारुण पराभव केला. कोलकाताने मुंबई संघाला २४ धावांच्या मोठ्या फरकानं हरवलं. त्यामुळे घरच्या मैदानावर मुंबईचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न धुळीला मिळालं आहे.

नक्की वाचा : मोदींच्या विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही : सुजय विखे

व्यंकटेश अय्यर आणि मनिष पांडेच्या भागीदारी ठरली गेमचेंजर (MI vs KKR )

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, केकेआर संघाची सुरुवात खूपच खराब झाली, ज्यामध्ये त्यांनी ७ धावांवर फिल सॉल्टच्या रूपात त्यांची पहिली विकेट गमावली. तर संघाचे टॉप-५ फलंदाजही जास्त वेळ टिकू शकले नाहीत. अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, सुनील नरेन आणि रिंकू सिंग यांनीही विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या उभारणे कठीण वाटत होते. पण व्यंकटेश अय्यर आणि मनिष पांडेच्या भागीदारीच्या जोरावर केकेआर १६९ धावांचा आकडा गाठला.

अवश्य वाचा : नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईचा संघ प्ले ऑफमधून बाहेर!  (MI vs KKR )

वानखेडे स्टेडियमवर १७ वर्षांनी कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याला चांगली खेळी करता आली नाही. कोलकाता विरुद्ध मुंबईकडून सूर्यानं एकाकी खेळी केली. सूर्यकुमार यादवनं झुंझार अर्धशतकं ठोकले. त्याने ३५ चेंडूत ५६ धावा केल्या. टीम डेव्हिडने २४ धावा केल्या, तर कॅप्टन हार्दिक पांड्या फक्त एक धावाकडून माघारी परतला. सूर्या बाद झाल्यावर संघाची आशा संपली आणि मुंबईने कोलकाता विरुद्ध चा सामना गमावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here