Chess : बुद्धिबळाचे कसब दाखवण्यासाठी लाकडी चेस बाेर्डवर खेळणार ३६० खेळाडू : नरेंद्र फिराेदिया

Chess : बुद्धिबळाचे कसब दाखवण्यासाठी लाकडी चेस बाेर्डवर खेळणार ३६० खेळाडू : नरेंद्र फिराेदिया

0
Chess
Chess : बुद्धिबळाचे कसब दाखवण्यासाठी लाकडी चेस बाेर्डवर खेळणार ३६० खेळाडू : नरेंद्र फिराेदिया

Chess : नगर : विविध राज्यातील खेळाडूंना बुद्धिबळाचे (Chess) कसब दाखवण्यासाठी नगरमध्ये बुद्धिबळ स्पर्धा (Chess tournament) आयाेजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या नवीन संकल्पनेतून स्पर्धेसाठी नवीन शंभर लाकडी चेस बाेर्ड तयार करण्यात आले असून यात आठ राज्यातील ३६० खेळाडू आपले कसब दाखवणार आहे. ही संकल्पना राज्यात कुठेही नसून फक्त अहमदनगर जिल्हा संघटनेकडे आहे. त्यामुळे दरवर्षी खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना बुद्धिबळ राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी व्यक्त केली. 

Chess
Chess : बुद्धिबळाचे कसब दाखवण्यासाठी लाकडी चेस

हे देखील वाचा: जातीवाचक शिवीगाळ, नग्न करुन मारहाण; तरुणाची आत्महत्या

अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचा प्रारंभ

बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय लाकडी बुद्धिबळ पटावर चाल देऊन करताना उद्योजक नरेंद्र फिरोदिया समवेत बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, खजिनदार सुबोध ठोंबरे, श्याम कांबळे, संजय खडके, प्रकाश गुजराती, दत्ता घाडगे, नवनीत कोंठारी, देवेंद्र ढोकळे, सुनील जोशी, अनुराधा बापट, डॉ. स्मिता वाघ, रोहिणी आडकर, पंच प्रवीण ठाकरे, शार्दुल टापसे, यशवंत पवार आदी उपस्थित हाेते.  

Chess
Chess : बुद्धिबळाचे कसब दाखवण्यासाठी लाकडी चेस

नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील

अनेक दिग्गज खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग (Chess)

या स्पर्धेत बुद्धिबळ खेळण्यासाठी खेळाडू गुजरात, आंध्र प्रदेश, दिव-दमन, गोवा, तमिळनाडू आदी राज्यातून ३६० खेळाडूं सहभागी झाले आहे. १७२ आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले खेळाडू आहे.  इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीसहित अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहे. साडेपाच वर्षाचा बाळ खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडूंनी देखील सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत प्रस्ताविकेत बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट म्हणाले, ”राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी वेगळा उपक्रम महाराष्ट्रात घेण्यासाठी शुक्रवार (ता. १९) ऑल इंडिया ओपन बिलो १६०० आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे.” अहमदनगर जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू सुयोग वाघ, देवेंद्र वैद्य, आशिष चौधरी, वेदांती इंगळे, हर्ष घाडगे, प्रज्वल आव्हाड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले, तर आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here