MLA Lahu Kanade : श्रीरामपूर तालुक्याला दुष्काळाच्या सवलती मिळणार : आमदार लहू कानडे

MLA Lahu Kanade : श्रीरामपूर तालुक्याला दुष्काळाच्या सवलती मिळणार : आमदार लहू कानडे

0
MLA Lahu Kanade : श्रीरामपूर तालुक्याला दुष्काळाच्या सवलती मिळणार : आमदार लहू कानडे
MLA Lahu Kanade : श्रीरामपूर तालुक्याला दुष्काळाच्या सवलती मिळणार : आमदार लहू कानडे

MLA Lahu Kanade : श्रीरामपूर: राज्य शासनाने (State Govt) जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त (Drought affected) यादीत श्रीरामपूर (Srirampur) तालुक्यातील चारही मंडळांचा समावेश करण्याच्या मागणीस अखेर यश आले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांनी दिली.

हे देखील वाचा : खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून नगरसाठी १ काेटी ४० लाखांचा निधी


राज्य शासनाने प्रारंभी ४० तालुक्यात दुष्काळ जाहिर केला होता. तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यास अखेर यश आल्याचे आमदार कानडे यांनी स्पष्ट केले. राज्यातील १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यात श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर, बेलापूर, टाकळीभान व उंदिरगाव या महसूल मंडळाचा समावेश असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतींचा लाभ मिळणार आहे.

नक्की वाचा : शिक्षकांचा वंचिताची दिवाळी उपक्रम प्रेरणादायी – अण्णा हजारे


या विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, यानुषंगाने प्रशासनिक विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रिय यंत्रणांकरिता आवश्यक ते पूरक आदेश निर्गमित करावेत, असे आदेश देण्यात आले असून दुष्काळी यादीत श्रीरामपूर तालुक्याचा समावेश केल्याने आमदार कानडे यांनी शासनास धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here