Sara Ali Khan : सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

सारा अली खानने 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाचं मोशन पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या सिनेमात सारा एक वेगळी भूमिका करताना दिसणार आहे.

0
167
सारा आली खानच्या 'ए वतन मेरे वतन' सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

नगर : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या दमदार अभिनयाने नेहमीच चर्चेत असते. आता सारा पुन्हा चर्चेत आली आहे ती तिच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan) या सिनेमामुळे. या सिनेमाचे मोशन पोस्टर आता आऊट झालं आहे. ‘इफ्फी’ (IFFI 2023) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे.

नक्की वाचा : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार   

साराने ‘ए वतन मेरे वतन’ या सिनेमाचं मोशन पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या सिनेमात सारा एक वेगळी भूमिका करताना दिसणार आहे. ‘ए वतन मेरे वतन’ या सिनेमात साराचा एक वेगळाच लूक पाहायला मिळाला आहे. ‘ए वतन मेरे वतन’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्येच अभिनेत्रीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. ‘ए वतन मेरे वतन’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.

अवश्य वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

पांढऱ्या रंगाची साडी, कपाळावर टिकळी असा साराचा साधा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत साराने लिहिलं आहे,”साहसी कहानी, या सिनेमाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे”.

धर्माटिक एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे तर कन्नन अय्यर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ए वतन मेरे वतन’ या सिनेमाचं लेखन दरब फारुकी आणि कन्नन अय्यरने केलं आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.  मात्र या  सिनेमाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here