Murder : कर्जत तालुक्यात विवाहितेचा खून 

सासरच्या मंडळींनी विवाहितेला गळफास देत तिचा खून केल्याची घटना बर्गेवाडी (ता.कर्जत) येथे घडली.

0
168
Murder : कर्जत तालुक्यात विवाहितेचा खून
Murder : कर्जत तालुक्यात विवाहितेचा खून

Murder : कर्जत : घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही तसेच दुसऱ्याचे येथे मजुरीने कामास जात नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला गळफास देत तिचा खून (Murder) केल्याची घटना बर्गेवाडी (ता.कर्जत) येथे घडली. सदरच्या घटनेतील आरोपीना अटक (Accused arrested) व्हावी, या मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी कर्जत पोलीस (Police) ठाण्याच्या आवारात मृतदेह (dead body) आणून ठेवत तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.

हे देखील वाचा : राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची सुब्रमण्यम स्वामींची तक्रार; गृहमंत्र्यांना धाडले पत्र

बर्गेवाडी येथील सोनाली दीपक पांडुळे (वय ३५) हीस लग्न झाल्यानंतर ५ वर्षांनी सासरच्या मंडळीने घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावे, असा तगादा लावला. पैसे न आणल्यामुळे तिचा शारीरिक, मानसिक छळ करीत होते. १८ नोव्हेंबर रोजी मयत सोनाली दुसऱ्याच्या येथे मजुरीने कामाला जात नाही म्हणून मारहाण केली. रविवारी (ता.१९) सकाळी ७ वाजता सोनाली हिने गळफास घेत मयत झाल्याचे समजले. माहिती समजली असता फिर्यादी भावाने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाहिला असता मयत सोनालीच्या गळ्याला दोर बांधला होता. तसेच त्याचे व्रण उमटले होते. तसेच तिच्या डोक्यास पाठीमागून जखम झालेली दिसली. 

नक्की वाचा : राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार

घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणत नाही तसेच दुसऱ्याचे येथे मजुरीने कामास जात नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळीने शारीरिक, मानसिक छळ करून तिच्या डोक्यात कशाने तरी मारून दोरीच्या साह्याने गळफास देत तिचा खून केल्याची फिर्याद गौरव महादेव झिंजे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली. वरील फिर्यादीवरून सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पोलीस निरीक्षक अनंत सालगुडे करीत आहे. सदर घटनेतील आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह कर्जत पोलीस ठाण्याच्या आवारात आणला होता. यावेळी संतप्त नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यात विलंब केल्याने पोलिसांना देखील धारेवर धरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here