Crime News : कोयत्याचा धाक दाखवून लुटला सव्वा लाखाचा मुद्देमाल

श्रीगोंदा तालुक्यातील बोरी येथील नितीन अढागळे यांना बेदम मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडून एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवार (ता.२०) रात्री नऊ वाजण्याचा सुमारास लोणी व्यंकनाथ शिवारात घडली.

0
152
कोयत्याचा धाक दाखवून लुटला सव्वा लाखाचा मुद्देमाल

श्रीगोंदा : तालुक्यातील बोरी येथील नितीन विठ्ठल अढागळे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी दुचाकी आडवी लावत स्कॉर्पिओमधील लोकांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडून एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना (A case of theft) सोमवार (ता.२०) रात्री नऊ वाजण्याचा सुमारास लोणी व्यंकनाथ शिवारात घडली.

नक्की वाचा :  राज्यात आणखी ‘२०’ हजार शिक्षकांची भरती होणार   

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवार (ता.२०) रात्री नऊ वाजण्याचा सुमारास फिर्यादी आणि त्याचे जोडीदार स्कॉर्पिओमधून लोणीव्यंकनाथ गावच्या शिवारातून माठकडे निघाले होते. त्यावेळी गायकवाड वस्तीजवळ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी नितीन अढागळे व त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या लोकांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

त्यानंतर सर्वांना गाडीच्या खाली ओढुन लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि हातातील कोयत्याचा धाक दाखवुन एक लाख रुपयांची रोख रक्कम तसेच १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरुन नेले. या प्रकरणी अधिक तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here