Movement : धूळ मुक्तीसाठी ‘माकप’ आंदोलन उभारणार

Movement : अकोले : शहर व ग्रामीण भागात रस्त्यांची निकृष्ट कामे व पावसाच्या पाण्याचे अयोग्य निस्सरणामुळे नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांचा (health problems) सामना करावा लागत आहे.

0
Movement : धूळ मुक्तीसाठी ‘माकप’ आंदोलन उभारणार
Movement : धूळ मुक्तीसाठी ‘माकप’ आंदोलन उभारणार

Movement : अकोले : शहर व ग्रामीण भागात रस्त्यांची निकृष्ट कामे व पावसाच्या पाण्याचे अयोग्य निस्सरणामुळे नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांचा (health problems) सामना करावा लागत आहे. याचबरोबर अकोले तालुक्यातील एसटी बस (ST Bus) सेवेचाही बोजवारा उडाला असल्याने ग्रामीण व दुर्गम भागांचा शहरांशी संपर्क तुटत चालला आहे. नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नांना केंद्रस्थानी आणण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (Marxist Communist Party of India) आंदोलनाची व्यापक तयारी सुरु केली असल्याचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

हे देखील वाचा : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या’ – सुप्रिया सुळे


अकोले शहरातील रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट झाल्याने व गटारीचे काम तसेच पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवल्याने ही महत्वाची बाजारपेठ धुळीने बरबटून गेली आहे. गटारीवर व रस्ता खाली झाल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारीत जाण्यासाठी ठेवण्यात आलेली व्यवस्था बुजविली गेल्याने शहरातील व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकारही वाढले आहेत. मागणी करूनही याबाबत तालुक्याचे लोकप्रतिनिधी, नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरेसे लक्ष दिलेले नाही.

नक्की वाचा : तेलंगणात भारतीय वायुसेनेच्या विमानाचा अपघात ; २ जणांचा मृत्यू


विशेष म्हणजे परिवहन मंडळाच्या बससेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यासाठी असलेल्या बसेस अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्या कोठेही बंद पडतात. बससंख्या व कर्मचारी संख्या कमी असल्याने अनेक गावांमध्ये बसेसची मागणी असूनही बससेवा सुरु होत नाही. फोफसंडीसारख्या गावाला कोपरे मांडावे मार्गे पुणे जिल्ह्यातून बस सुरु होती. मात्र अकोले तालुक्यातून बस जात नाही. शालेय विद्यार्थ्यांनाही पुरेशा बसेस उपलब्ध होत नाहीत. परिवहन मंडळाशी संबंधित हे सारे प्रश्न, खराब रस्ते, धूळ व यामुळे निर्माण होणार्‍या नागरी समस्यांचे प्रश्न घेऊन माकपच्यावतीने तालुकाव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात येत आहे.  


त्यानुसार अकोले, कोतूळ, समशेरपूर, राजूर, गणोरे, खिरविरे व ब्राम्हणवाडा या प्रमुख बाजारपेठांमध्ये पहिल्या टप्प्यात आंदोलने करण्यात येणार आहेत. विभागातील शेतकरी, आदिवासी व श्रमिकांचे प्रश्नही या आंदोलनांमध्ये घेण्यात येणार आहेत. आंदोलनांच्या या टप्प्याची सुरुवात राजूर येथील बेमुदत ठिय्या आंदोलनाने होणार असल्याचे डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड, गणेश ताजणे, राजाराम गंभिरे, शिवराम लहामटे, संगीता साळवे, जुबेदा मणियार, आराधना बोर्‍हाडे, प्रकाश साबळे, अनिता साबळे, तुळशीराम कातोरे, सोमा मधे, भीमा मुठे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here