Movement : आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे टाळे ठोको आंदोलन स्थगित

Movement : आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे टाळे ठोको आंदोलन स्थगित

0
Movement : आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे टाळे ठोको आंदोलन स्थगित
Movement : आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे टाळे ठोको आंदोलन स्थगित

Movement : श्रीरामपूर : बेलापूर बुद्रुक येथील बेलापूर-रामगड सेक्शनला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरवरील वीज पुरवठा (Power supply) सुरळीत करण्यासंदर्भात आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तसेच माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणच्या (Mahavitaran) अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन (Movement) तूर्तास स्थगित केले.

नक्की वाचा : जिल्हा प्रशासन मिशन माेडवर; मराठा सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात वीस हजार कर्मचाऱ्यांची हाेणार नियुक्ती


बेलापूर येथील बोरावके, गिरमे, कुऱ्हे, फरगडे, मोरगे, सोनवणे ट्रान्सफॉर्मर यापूर्वी एमआयडीसी सेक्शनला जोडलेले होते. तथापि मागील १५ दिवसांपूर्वी महावितरणने सदर ट्रान्सफॉर्मर (बेलापूर रामगड) सेक्शनला जोडले. सदर सेक्शनवर जास्तीचा लोड शिल्लक नसतानाही ट्रान्सफॉर्मर बेलापूर सेक्शनला जोडल्याने सदर ट्रान्सफॉर्मवरुन अतिशय कमी प्रमाणात वीज पुरवठा होत आहे. एकुण आठ तास मिळणाऱ्या विजेपैकी जेमतेम एक ते दोन तास वीज पुरवठा सुरु राहतो. अनेकदा तोही कमी दाबाने मिळतो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी व इतर ग्राहक जेरीस आलेले आहेत. महावितरणने सदर ट्रान्सफॉर्मर पुर्ववत एमआयडीसी सेक्शनला जोडावा, अन्यथा शेतकरी महावितरणच्या कार्यालयाला ठाळे ठोकतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.

हे देखील वाचा : डिजेने तिघांना चिरडले; दोघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी


याबाबत आमदार लहू कानडे यांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आमदार कानडे यांच्या संपर्क कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्यासह शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर पूर्ववत एमआयडीसी सेक्शनला जोडण्याची मागणी केली. याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, तोपर्यंत आहे त्याच ट्रान्सफॉर्मरुन वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासान  भंगाळे यांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले. यावेळी महावितरणचे उप अभियंता प्रमोद केदार, सहायक अभियंता शिरीष वाणी, सहायक अभियंता प्रभाकर माळी तसेच शेतकरी माजी उपसभापती दत्ता कुऱ्हे, प्रकाश मेहेत्रे, जयंत गिरमे, रघुनाथ सोनावणे, सुमित गिरमे, निलेश वाबळे, अजय सोनावणे, वैभव कुऱ्हे, दिलीप कुऱ्हे, मनोज मेहेत्रे, सोहम लगे, विलास कुऱ्हे, अनिल कुऱ्हे, संजय दुधाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here