Murder : अखेर ‘त्या’ हत्येचा तपास सीआयडीकडे; पोलीस महानिरीक्षकाचे निर्देश

Murder : अखेर 'त्या' हत्येचा तपास सीआयडीकडे; पोलीस महानिरीक्षकाचे निर्देश

0
Murder
Murder

Murder : राहुरी: जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्यांचे अपहरण (Abduction) व हत्येच्या (Murder) घटनेचा तपास अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) (CID) कडे देण्यात आला आहे. असे निर्देश मुंबई येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी पारीत केलेल्या आदेश पत्रात नमूद केले आहेत.

हे देखील वाचा : कोयत्याचा वार करून तरुणाचा खून

किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार (Murder)


राहुरी येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्यांचे २५ जानेवारी रोजी अपहरण करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे), (भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा), शुभम संजीत महाडिक ( रा.मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनिल मोरे (रा.उंबरे) या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेतील तीन आरोपींनी तत्काळ राहुरी येथील न्यायालयासमोर कबुली जबाब देऊन गुन्हा कबुल केला. यातील किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे तसेच चोरी, दरोडे, घरफोडी, रस्तालूट, जिवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

नक्की वाचा: मनाेज जरांगे पाटलांनी उगारलं पुन्हा आंदाेलनाचं हत्यार; १० फेब्रुवारीपासून उपाेषण

मृतदेह मिळाले तेव्हा त्यांच्या अंगावर पाच ते सहा लाखाचे दागिने (Murder)

सदर वकील दाम्पत्यांचे हत्याकांड हे २० हजार रुपये फिसाठी झाले. त्यानंतर पाच लाख रूपये खंडणीसाठी झाले, अशी पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात आढाव दाम्पत्यांचे मृतदेह मिळून आले, तेव्हा त्यांच्या अंगावर पाच ते सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. त्यामुळे सदर हत्याकांड हे फी किंवा खंडणीसाठी झालेले नसून पोलीस प्रशासनाकडून तपास भरकटण्याचे काम सुरू असल्याचा आरोप वकील संघाकडून करण्यात आला होता. २९ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकिलांनी राहुरी येथे हजर राहुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध सभा घेतली. तसेच पोलीस तपासा बाबत शंका व्यक्त करून सदर तपास सीआयडी कडे द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुंबई येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी सदर घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आल्याचे निर्देश दिले आहेत. सदर आदेश हे अप्पर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक तसेच अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक यांना पारीत केले आहेत.

Murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here