Theft : तलवारीचा धाक दाखवत दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

Theft : तलवारीचा धाक दाखवत दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

0
Theft

Theft : श्रीगोंदा : दोन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी किराणा दुकानदारांना टेम्पोने माल पोहोच करणाऱ्या टेम्पो चालकाला रस्त्यात अडवून तलवारीचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच दोन मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण एक लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन (Theft) नेला. या प्रकरणी निलेश नामदेव जाधव (वय ४३, रा.काष्टी) यांच्या फिर्यादीवरून (complaint) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा : कोयत्याचा वार करून तरुणाचा खून

सहा अज्ञात चोरट्यांनी टेम्पो अडवला (Theft)


या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी मंगळवारी (ता.३०) रात्रीचे सुमारास अजनुज ते काष्टी रस्त्यावर दत्तवाडी ते गणेश परिसरातून जात असताना बिगर नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या सहा अज्ञात चोरट्यांनी टेम्पोला अडवला.

नक्की वाचा: सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या : डॉ. अमोल कोल्हे

एक लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुला (Theft)

टेम्पो चालकाला तलवारीचा धाक दाखवत मारहाण करून गाडीतील दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर अभंग करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here