Rohit Pawar : राेहित पवार यांची उद्या ईडी चाैकशी

Rohit Pawar : राेहित पवार यांची उद्या ईडी चाैकशी

0
Rohit Pawar
Rohit Pawar

Rohit Pawar : नगर : आमदार रोहित पवारांची उद्या (ता. १) दुसऱ्यांदा ईडी (ED) चौकशी होणार आहे. बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. बारामती अग्रो संदर्भात, रोहित पवार (Rohit Pawar) यांची २५ जानेवारी रोजी ईडी चौकशी झाली होती. उद्या चौकशीच्या वेळेस रोहित पवार समर्थक ईडी ऑफिस समोर जमणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे देखील वाचा : कोयत्याचा वार करून तरुणाचा खून

सत्याचा विजय होणार आहे (Rohit Pawar)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. ईडी कार्यालयाबाहेर यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली हाेती. सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु, मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. चूक केली नसेल तर घाबरण्याचं कारण काय? असा सवाल करताना रोहित पवार यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना आपले पूर्ण सहकार्य असेल, असे स्पष्ट केले.

नक्की वाचा: सर्वसामान्यांसाठी लढणारे वाघासारखे लोकप्रतिनिधी निवडून द्या : डॉ. अमोल कोल्हे

रोहित पवार समर्थकांच्या भूमिकेकडे लक्ष (Rohit Pawar)

दरम्यान, तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार रात्री १० वाजता ईडी कार्यालयाबाहेर पडले हाेते. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात येत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. सुप्रिया सुळे देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. रोहित पवार यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा उपस्थित होते. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली. आता उद्या पुन्हा ईडीकडून राेहित पवारांची चाैकशी हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राेहित पवार समर्थक काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here