Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या कारवर हल्ला

Bharat Jodo Nyay Yatra : पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

0
Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra

नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyay Yatra) सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. या दरम्यान एक मोठी घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये राहुल गांधींच्या वाहनावर हल्ला झाला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक (Stone Throwing) करण्यात आली. त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्यात. काँग्रेसनं याला सुरक्षेतील त्रुटी म्हटलंय. मात्र सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.

नक्की वाचा : बजेटपूर्वी केंद्र सरकारकडून दिलासा; मोबाईल फोन स्वस्त होणार

‘पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींना येण्यापासून अडवलं जातय’:अधीर रंजन चौधरी (Bharat Jodo Nyay Yatra)

ही दगडफेक झाल्यानंतर राहुल गांधी खाली उतरले. त्या गाडीमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी ही उपस्थित होते. त्यांनी बंगाल सरकारवर आरोप केला आहे. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, ‘राहुल गांधी ज्या वाहनातून प्रवास करत होते. त्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनाच्या मागील खिडकीची काच फुटली. ज्यावेळी राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यावेळी मी आतमध्येच होतो. पाठीमागून कोणीतरी दगड फेकून मारल्याचं दिसले. पण पश्चिम बंगालमध्ये राहुल गांधींना येण्यापासून अडवलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये न्याय यात्रेने प्रवेश केल्यापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अवश्य वाचा : अभिनेता सोनू सूदने पटकावला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार

राहुल गांधीवरील हल्ला म्हणजे कट – अधीर रंजन यांचा आरोप (Bharat Jodo Nyay Yatra)

भारत जोडो न्याय यात्रेला राज्य सरकारचा सपोर्ट नाही. मुर्शिदाबाद जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी ज्या स्टेडियमवर रात्री मुक्कामी थांबणार होते, त्याचीही परवानगी मिळाली नाही. आतापर्यंत घडलेल्या घटनेवरुन कट रचला जातोय असे वाटतेय, असे अधीर रंजन म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here