Murder : श्रीरामपुरात पत्नीनेच केली पतीची हत्या

Murder : श्रीरामपुरात पत्नीनेच केली पतीची हत्या

0
Murder : श्रीरामपुरात पत्नीनेच केली पतीची हत्या
Murder : श्रीरामपुरात पत्नीनेच केली पतीची हत्या

Murder : श्रीरामपूर : पतीच्या दारूच्या व्यसनाला (Alcohol addiction) कंटाळलेल्या पत्नीने पतीची हत्या (Murder) करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. पतीचा पाय घसरुन पडून मृत्यू झाल्याचा पत्नीने केलेला बनाव खोटा ठरला आणि आरोपी पत्नीला पोलिसांनी (Police) अटक केली.

हे देखील वाचा : पैशांसाठी नातंही विसरला; बहिणीच्या घरात भावानेच केली लाखाे रुपयांची घरफोडी


याबाबत अधिक माहिती अशी की, एक जानेवारीला पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास संजय गवुजी भोसले (वय ४०, रा.अतिथी कॉलनी, वार्ड क्र.१, श्रीरामपूर) हे त्याच्या राहत्या घराच्या पायरीवरुन पाय घसरुन पडले. त्यात त्यांच्या डोक्यास मार लागून मृत्यू झाल्याच्या माहितीवरुन शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, सदर मयत व्यक्तीच्या मृत्यूबाबत पोलीस पथकास संशय आला. घटनास्थळाची पाहणी करुन, मयताच्या डोक्यास झालेल्या जखमांबाबत डॉक्टारांकडून माहिती घेतली. त्यावेळी सदरच्या जखमा पायरीवरुन पाय घसरुन पडल्याने झालेल्या नसून त्या शस्त्राने झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मयताची पत्नी संगिता भोसले (वय ३८) हिला तत्काळ ताब्यात घेतले. तिच्याकडे तपास केला असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेत सखोल तपास केला असता तिने पती हे दारु पिवून नेहमी त्रास देत, त्यामुळे आमच्यात नेहमी वाद होत असल्याचे सांगितले.

हे देखील वाचा : सोमय्यांचा वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न : जयंत पाटील

३१ डिसेंबरला वर्षातील शेवटचा दिवस असल्याने पती जास्त दारु पिले होते. त्यांच्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून ते बाहेरील वरंड्यात उभे असताना त्यांना ढकलून दिले. ते खाली पडले तेव्हा त्यांच्या कामाच्या पिशवीमध्ये असलेला टॉमीसारखा रॉड काढून रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात पाच ते सहा वार केले. त्यामध्ये त्याचे डोके फुटुन रक्तस्त्राव होवून त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. त्यानंतर शहर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नीस तत्काळ अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here