Murder : पत्नी व मुलाची हत्या करत गळफास घेऊन कुटुंब प्रमुखाची आत्महत्या

Murder : पत्नी व मुलाची हत्या करत गळफास घेऊन कुटुंब प्रमुखाची आत्महत्या

0
crime
Murder : पत्नी व मुलाची हत्या करत गळफास घेऊन कुटुंब प्रमुखाची आत्महत्या

Murder : पारनेर : सासुरवाडीला निघालेल्या व्यक्तीने रस्त्यात दोन्ही मुलांना विषारी औषध पाजून पत्नी व मुलाची हत्या (Murder) करत गळफास घेतला (suicide). विषारी पदार्थ पाजत असताना मुलीने पळ काढल्याने ती बचावली. यात पती-पत्नी व मुलाचा मृत्यू (death) झाला. गजानन रोकडे (वय ३५ ), पौर्णिमा रोकडे (वय ३४), दुर्वेश रोकडे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. चैताली रोकडे (वय ९) यात थोडक्यात बचावली. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे घडली. याबाबत विजय भगवान रोकडे (वय-४३, रा. उदापूर, ता.जुन्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

हे देखील वाचा : काँग्रेसने ४८ जागांवरील इच्छुकांची मागवली नावे; मित्रपक्ष बुचकळ्यात


गजानन रोकडे ,पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत. रोकडे कुटुंब काल श्रीरामपूर तालुक्यातील सासुरवाडीला दुचाकीवरून चालले होते. वारणवाडी शिवारात आल्यानंतर दोघा पती-पत्नीत वाद झाले. गजानन यांच्याकडे असलेला विषारी पदार्थ त्याने दोन्ही मुलांना पाजला. त्याच दरम्यान मुलगी चैताली हिने तिथून पळ काढला. गजानन याने सहा वर्षाच्या मुलाला पाण्यात फेकले व नंतर पत्नी पौर्णिमा हिला गळफास दिला. नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. मुलगी बचावली असल्याने या घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळतात पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.

नक्की वाचा : ईव्हीएम मशिन हटवा, लाेकशाही वाचवा; बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची विराेधकांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here