Murder | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील केडगाव उपनगरातील रेणुका माता मंदिराजवळील शास्त्रीनगरमध्ये एका तरुणाचा काल (ता. २४) रात्री उशिरा खून (Murder) झाला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे समजते. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केडगाव उपनगरातील रेणुका माता मंदिर जवळ शास्त्रीनगर येथे घडली.विपुल छोट्या काळे (वय ३०, देवी मंदिरापाठीमागे, शास्त्रीनगर, केडगाव) असे मयताचे नाव आहे.
हे वाचा – विद्यार्थी वसतीगृहाच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर करा : ललित गांधी
आईने दिली फिर्याद (Murder)
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात मयताची आई शास्त्री काळे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा विपुल काळे याचे मागील काही दिवसांपूर्वी सुरेश जाटला काळे, संदीप ढोल्या चव्हाण, कुणाल सुरेश काळे (तिघे रा.दूध सागर सोसायटी, केडगाव), चाईन फायर काळे, दारुचंद फादर चव्हाण व सुंदर नितीन काळे (तिघे रा. साठे वस्ती, शेंडी, ता. अहिल्यानगर ) यांच्यासोबत फिर्यादीची मुलगी लसी चव्हाण हिला नांदवण्याच्या कारणावरून वाद झाले होते.
अवश्य वाचा – शेवगावात ऑनलाईन बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
असा झाला खून (Murder)
२४ एप्रिल रोजी सायंकाळी विपुल काळे हा त्याची बहीण मीना चव्हाण, लसी चव्हाण व दुर्गेश चव्हाण असे भाजीपाला आणण्यासाठी केडगाव देवी रस्त्यावर गेले होते. त्यावेळी सुरेश काळे, संदीप चव्हाण, कुणाल काळे, चाईन काळे, दारूचंद चव्हाण, सुंदर काळे यांनी विपुल काळे यास रस्त्यात अडवून मागील वादाच्या कारणावरुन मारहाण केली. याबाबत दुर्गेश चव्हाण यांनी घरी जाऊन शास्त्री काळे यांना सांगितल्याने त्या ताबडतोब घटनास्थळी गेल्या. त्यांना विपुल गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्याला मारहाण करणारे तेथून पळून गेले. शास्त्री काळे यांनी विपुलला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.